मुंबई अतिधोकादायक इमारती वाढल्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई अतिधोकादायक इमारती वाढल्या

Share This
मुंबई : गतवर्षीच्या तुलनेत धोकादायक इमारतींचा आकडा यंदा वाढला आहे़ तब्बल ७४० इमारती कोसळण्याच्या स्थितीत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे़. पावसाळ्यापूर्वी पालिकेने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे़ गेल्या वर्षी ५४२ इमारती अतिधोकादायक असल्याचे आढळून आले होते़ यंदा मात्र हा आकडा वाढून तब्बल ७४० वर पोहोचला आहे़ सी १ श्रेणी म्हणजे अतिधोकादायक इमारतींच्या यादीमध्ये शहरात १४६, पूर्व उपनगरात २८६ आणि पश्चिम उपनगरात ३०८ इमारतींचा समावेश आहे़ या इमारती पावसाळ्यात कोसळण्याचा धोका आहे़. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages