दुचाकींवरुन हेल्मेट न घालतां प्रवास - ३,९०४ सहप्रवाशांवर दंडात्मक कारवाई - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दुचाकींवरुन हेल्मेट न घालतां प्रवास - ३,९०४ सहप्रवाशांवर दंडात्मक कारवाई

Share This
मुंबई : मुंबईत दुचाकीस्वाराप्रमाणेच त्याच्या मागे बसून प्रवास करणाऱ्या सहप्रवाशालाही हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला आहे. २९ एप्रिलपासून दुचाकींवरुन प्रवास करताना हेल्मेट न घालणाऱ्या सहप्रवाशांवर कारवाईला सुरुवात करण्यात आली. पहिल्या तीन दिवसांत तब्बल ३ हजार ९0४ सहप्रवाशांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे.

दुचाकीच्या अपघातांमध्ये अनेकदा हेल्मेट न घातल्याने सहप्रवांशाचाही मृत्यू होतो. २0१५ मध्ये दुचाकीस्वारांचे १८९ प्राणांतिक अपघात झाले. यात १२७ दुचाकीस्वारांबरोबर ६२ सहप्रवाशांनाही जीव गमावला, तर सुमारे २४१ सहप्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १२९ नुसार दुचाकीस्वार चालकाबरोबरच त्याच्या मागे बसून प्रवास करणाऱ्या व्यक्तीलाही परिवहन विभागाकडून जानेवारी २0१६ पासून हेल्मटसक्ती करण्यात आली. हेल्मेट सक्ती करतानाच २00३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा आधारही परिवहन विभागाने घेतला. विनाहेल्मेट सहप्रवाशांवर कारवाई मध्यंतरी विद्यार्थ्यांच्या परिक्षांमुळे थांबविण्यात आली होती. मात्र २९ एप्रिलपासून पुन्हा ती सुरू झाली. २९ एप्रिल रोजी ९२८ केसेस दाखल झाल्या. ३0 एप्रिल रोजी कारवाईचा हाच आकडा वाढून तो १ हजार ८८१ एवढा झाला. त्यानंतर १ मे रोजीही केलेल्या कारवाईत तब्बल १ हजार ९५ सहप्रवाशांना वाहतूक पोलिसांनी पकडले आहे. या सर्वांवर १00 रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages