पाणी माफियाना राजाश्रय देवू नका
मुंबई /अजेयकुमार जाधव
मुंबई मधे मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत आहे. ही पाणी चोरी करणारे पाणी माफिया त्यात सहभागी असलेले लोकप्रतिनिधी यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी भाजपाने पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकड़े केली असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेतील भाजपाचे पक्ष प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी पत्रकारांना दिली. यावेळी अश्या पाणी मफियाना कोणत्याही राजकीय पक्षाने राजाश्रय देवू नए अशी मागणी भाजापाने केली आहे.
मुंबई मधे 27 टक्के पाण्याची गळती होते. 27 टक्के पैकी 15 टक्के पाणी गळती आहे. मग 12 टक्के पाणी जाते कुठे याचा शोध घेताना चांदीवली येथील मनोज तिवारी या भाजपाच्या कार्यकर्त्याने संतोष पवार याला पाणीचोरी करताना रंगेहात पकडले. राष्ट्रवादीच्या नगरसेविका सरिता पवार यांचा हा दिर असून माजी नगरसेवक शरद पवार यांचा हा भाऊ आहे. मनोज तिवारी यांनी पाणीचोरी करताना पकडले म्हणून त्याला या पवार कुटुंबीयांकडून मारहाण करण्यात आली. याबाबत पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केल्याचे शिरसाट यांनी सांगितले.
पाणी चोरीमधे भाजपा अडसर ठरत असल्याने भाजपात पवार कुटुंब प्रवेश करणार होते परंतू भाजपाने याना थारा दिला नाही म्हणून या पवार कुटुंबाने शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईकर जनतेचे हक्काचे पाणी चोरणाऱ्या अश्या माफियाना राजकीय पक्षानी थारा देवू नए असे आवाहन शिरसाट यांनी केले आहे. सध्या अश्या पाणी माफियावर कारवाई करण्यासाठी कायदा नसल्याचे पोलिस सांगत असले तरी पाणी चोरी हा संघटित गुन्ह्याचा भाग असल्याने त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी यासाठी पालिका आयुक्तानी मुंबई पोलिस आयुक्ताना पत्र दिले असल्याचे भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी सांगितले.
मित्र पक्षाला सल्ला पाणी चोरी करणारे मुंबईकर जनतेचे पाणी चोरून आपला धंदा करत आहेत. अश्या पाणी चोरी करणाऱ्या माफियाना इतर पक्षाप्रमाणे मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनेही थारा देवू नए असा सल्ला मनोज कोटक यांनी दिला आहे.
बेस्ट बाबत मंगळवारी बैठक मुंबईमधील बेस्टचे 52 बस मार्ग बंद केल्याचे पडसाद सर्वत्र उमटल्यावर भाजपाचे बेस्ट समिती अध्यक्ष मोहन मीठबावकार यांनी बंद केलेले बस मार्ग पुन्हा सुरु करण्याचे महाव्यवस्थापकाना निर्देश दिले आहेत. महाव्यवस्थापक मंगळवारी सकाळी आराखडा बेस्ट समिती अध्यक्षांना सादर करणार आहेत. त्यानंतर मुंबईकर नागरीकाना त्रास होणार नाही असा निर्णय घेवु असे मनोज कोटक यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment