मुंबई भाजपाच्‍या प्रमुख प्रवक्‍तेपदी भालचंद्र शिरसाट यांची नियुक्‍ती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई भाजपाच्‍या प्रमुख प्रवक्‍तेपदी भालचंद्र शिरसाट यांची नियुक्‍ती

Share This
मुंबई, दि 30 - मुंबई महापालिकेचा अभ्‍यास असलेल्‍या माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांची आज मुंबई भाजपाच्‍या प्रमुख प्रवक्‍त्‍ेापदी नियुक्‍ती करण्‍यात आल्‍याची माहिती मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी जाहीर केली. 


भालचंद्र शिरसाट हे दोन वेळा घाटकोपर विभागातून नगरसेवक म्‍हणून निवडून आले होते. त्‍यांनी महापालिकेत भाजपा गटनेते, सुधार समिती अध्‍यक्ष आणि स्‍थायी समिती सदस्य अशा महत्‍वाच्‍या जबाबदाऱया सांभाळल्‍या होत्‍या. इंजिनिअरींग पर्यंत शिक्षण घेतलेल्‍या शिरसाट यांचा मुंबईचा शहर विकास आखाखडा, पायाभूत सेवा सुविधा आणि महापालिकेचा अर्थसंकल्‍प व कामकाज पध्‍दती याचा अभ्‍यास असल्‍यामुळे यापुढील काळात पक्षाची बाजू माध्‍यमांमध्‍ये प्रभावीपणे मांडली जावी म्‍हणून त्‍यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

दरम्‍यान, महापालिका निवडणुकांच्‍या पार्श्‍वभूमिवर महापालिकेचा अभ्‍यास असलेल्‍या प्रवक्‍त्‍यांची टीम लवकर जाहीर करण्‍यात येणार असून महापालिका बजबजपूरी झाली असून त्‍याला मुंबईकर कंटाळले आहेत. अशावेळी वास्‍तवादी चित्र व पक्षाची भूमिका मांडयासाठी अभ्‍यासू प्रवक्‍त्‍यांची टीम घोषीत लवकरच करू, असेही  आमदार अॅड आशिष शेलार यांनी प्रसिध्‍दीस दिलेल्‍या पत्रकात म्हटले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages