मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात एका आरोपीला ४ महिने बेकायदेशीर पणे ठेवल्या प्रकरणी पालिका रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व माध्यमिक आरोग्य सेवेचे खाते प्रमुख डॉ महेंद्र वाडीवाला यांना निलंबित करण्यात आले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात २५० कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणी आरोपी असलेल्या शेखर चंद्रशेखर याला ४ महिने ठेवण्यात आले होते. शेखर चंद्रशेखर वर या ४ महिन्यात कोणतेही उपचार न करता खातीरदारी केली जात होती.एका आरोपीची पालिकेच्या रुग्णालयात खातिरदारी होत असल्याच्या बातम्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्यावर पालिकेच्या आरोग्य समितीमध्ये याचे पडसाद उमटले होते. दोषी अधिकाऱ्यावर व डॉक्टरांवर कारवाईसाठी दोन वेळा आरोग्य समितीची बैठक स्थगित करण्यात आली होती.
या प्रकरणी महापालिकेने चौकशी समिती नेमली होती. चौकशी समितीने दिलेल्या अहवालात शेखर चंद्रशेखर याची खातिरदारी करताना नर्स आणि वार्ड बॉय यांना प्रती शिफ्ट एक हजार ते दोन हजार दिले गेल्याचे व हे सर्व प्रकार डॉ महेंद्र वाडीवाला यांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचे समोर आले आहे. चौकशी समितीच्या अहवालात डॉ महेंद्र वाडीवाला यांना दोषी ठरवल्याने महापालिकेने डॉ महेंद्र वाडीवाला यांना निलंबित केले आहे.

No comments:
Post a Comment