मुंबई / प्रतिनिधी - मुंबईमधे रस्त्यावर खड्डे पडल्याची नेहमीच तक्रार असते. रत्यावरील खड्यांची डोकेदुखी मुंबईकराना नेहमीच सतावत असते. यावर वेबसाईटचा पर्याय उपयोगी ठरला असताना आता मुंबई महापालिकेने मोबाईल ऍप सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जून रोजी सुरु केल्या जाणाऱ्या या ऍप्समुले मोबाईल मधे खड्यांचे फोटो काढून पालिकेला पाठवता येणार आहेत अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी दिली.
1 जूनला सुरु केल्या जाणार्या ऍप्सद्वारे लोंगिटुड आणि ल्याटीटुड दर्शवणारे फोटो पालिकेकड़े पाठवले जाऊ शकतात. लोंगिटुड आणि ल्याटीटुड आणि तारीख वेळ याद्वारे पालिकेला नेमके खड्डे कुठे आहेत याची माहिती उपलब्ध होणार आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी प्रत्तेक परीमंडळाला 5 करोड या प्रमाणे 7 परिमंडळाला 35 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती संजय देशमुख यांनी दिली.
मुंबईमधे 1 एप्रिल 2016 पूर्वीची 376 रस्त्यांची कामे सुरु आहेत. त्यापैकी 135 कामे अपूर्ण आहेत. तर 1 एप्रिल 2016 नंतर वर्क ऑर्डर दिलेली 641 रस्त्याची कामे सुरु असून यापैकी 24 कामे पूर्ण झाली आहेत.मुंबईमधे सध्या एकूण 1017 रस्त्याची कामे सुरु असून त्यापैकी 617 रस्त्याची कामे प्रगतीपथावर आहेत. मुंबईमधे 122 जंक्शन आहेत. त्यापैकी 6 जंक्शनची कामे पूर्ण झाली आहेत. रस्त्याची आणि जंक्शनची जी कामे सुरु आहेत ती कामे असून 31 मे पर्यंत पूर्ण करून रस्ते आणि जंक्शन पावसाळयासाठी सज्ज ठेवले जातील असे संजय देशमुख यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment