नीट चा तिढा सोडविल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन --रामदास आठवले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नीट चा तिढा सोडविल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन --रामदास आठवले

Share This
नविदिल्ली - वैद्यकीय अभ्यासक्रमाची राष्ट्रीय सामायिक पात्रता ( नीट ) परिक्षेसाठी या वर्षी सी ई टि असणाऱ्या राज्यांना वगळण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाने घेऊन तसा अध्यादेश काढून नीट चा नीट तिढा सोडविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे रिपब्लिकन पक्षातर्फे रिपाइंचे राष्ट्रिय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी अभिनंदन केले आहे

नीट परीक्षा सर्वोच्च  न्यायालयाच्या  आदेशानुसार पुढील महिन्यात घ्यावी लागली असती तर सी ई टी परीक्षा दिलेल्या ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होईल त्यामुळे यावर्षी नीट परीक्षेतून सीईटी असणाऱ्या राज्यांना वगळावे अशी विनंती रिपब्लिकन पक्षातर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना तसेच केंद्र सरकारला केली होती राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचीही मागणी केंद्रासरकारने मंजूर केल्याबद्दल रिपब्लिकन पक्षातर्फे  सरकारचे अभिनंदन करीत असल्याची प्रतिक्रिया खसदार रामदास आठवले यांनी आज प्रसिद्धि माध्यमांना दिली

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages