महानगरांचा सुनियोजित आणि शिस्तबद्ध विकास - महानगरांचा सुनियोजित आणि शिस्तबद्ध विकास - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महानगरांचा सुनियोजित आणि शिस्तबद्ध विकास - महानगरांचा सुनियोजित आणि शिस्तबद्ध विकास

Share This
मुंबई ३ मे २०१६ - महाराष्ट्रातील महानगर प्रदेशांचा सुनियोजित आणि शिस्तबद्ध विकास करण्यासाठी या प्रदेशांच्या विकासाचे एकात्मिक नियोजन व समन्वयन करणे गरजेचे होते. त्यादृष्टीने प्रस्तावित असलेल्या महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अध्यादेशाच्या मसुद्याला आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

महाराष्ट्रातील महानगर प्रदेशात येणाऱ्या महानगरपालिका, नगरपरिषदा तसेच परिसरातील गावांचा जलद, सुनियोजित व शिस्तबद्ध विकास करण्याबरोबरच विविध प्रकल्प राबविताना सुसुत्रता राहण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे प्राधिकरण स्थापन करुन त्यास संविधानिक दर्जा देण्याच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या अध्यादेशाच्या मसुद्यास आज मान्यता देण्यात आली. हे प्राधिकरण मुंबई महानगर प्रदेश वगळता उर्वरित राज्यातील विविध महानगर प्रदेश क्षेत्राचे नियोजन व समन्वय करेल. या प्राधिकरणात मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, गृहनिर्माण मंत्री, संबंधित पालकमंत्री, नगरविकास राज्यमंत्री, या क्षेत्रातील महापौर, जिल्हा परिषद, रोटेशन पद्धतीने नगराध्यक्ष, चार विधानसभा सदस्य, विधानपरिषदेचा एक सदस्य आदींसह विविध अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश असेल. पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणास स्वतंत्र कायद्यान्वये दर्जा व अधिकार देण्यासाठी महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिनियमाची तातडीने अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. यासाठी आज या विधेयकाच्या मसुद्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages