डॉ. आ. ह. साळुंखे, नाटककार शफाअत खान पुरस्काराचे मानकरीमुंबई : दिनांक 2 मे 2016
अश्वघोष आर्ट्स अँड कल्चरल फोरमकडून देण्यात येणारा ‘महाकवी अश्वघोष व दादू इंदुरीकर जीवनगौरव पुरस्कार’ सोहळा, मंगळवारी, ३ मे रोजी सायं. ५ वाजता डॉ. आंबेडकर भवन, दादर पूर्व येथे होत आहे. यंदाच्या ‘महाकवी अश्वघोष जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ संशोधक व विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे ठरले आहेत. तर जेष्ठ नाटककार शफाअत खान हे महाराष्ट्राचे वगसम्राट दादू इंदुरीकर जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. हे दोन्हीही जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते आणि प्रमुख उपस्थितीत डॉ. आ.ह. साळुंखे आणि शफाअत खान यांना प्रदान करण्यात येणार आहेत.
महात्मा जोतिबा फुले यांचा १२५ वा स्मृतीदिन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमहोत्सवाच्या १२५ वा जयंती सोहळ्यानिमित्त होत असलेल्या या जीवनगौरव पुरस्कार सोहळ्यात एका खास परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले असून या परिसंवादात डॉ. आ.ह. साळुंखे, डॉ. रावसाहेब कसबे, प्रा. हरी नरके, मुंबई विद्यापीठातील डॉ. सुधाकर गायकवाड़, शफाअत खान, अश्वघोष संस्थेचे प्रमुख जयराम जाधव, राजेंद्र झेंडे आदी मान्यवर वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या जीवकार्यावर आपले विचार मांडणार आहेत.
‘महाकवी अश्वघोष व दादू इंदुरीकर जीवनगौरव पुरस्कार’ जीवनगौरव पुरस्कार सोहळ्याचे यापूर्वीचे मानकरी ज्येष्ठ अभिनेते निळू फुले, महाकवी नामदेव ढसाळ, लोकशाहिर विठ्ठल उमप, विचारवंत रावसाहेब कसबे आदी मान्यवर ठरले आहेत.
अश्वघोष संस्थेच्या या पुरस्कार सोहळ्याला राज्यात कला, संस्कृती, साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक संस्थेचे प्रतिनिधि आणि नाट्य कलावंत मोठ्या संखेने उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संस्थेचे प्रमुख जयराम जाधव यानी दिली.

No comments:
Post a Comment