मुंबई / प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विकास नियोजन खात्याद्वारे तयार करण्यात आलेल्या प्रस्तावित `प्रारुप विकास नियोजन आराखडा २०१४-२०३४ बाबत`प्रारुप विकास नियंत्रण नियमावली` यातील भाग ५,६ मधील ३३(१०) वगळून,८ व भाग ७ मधील नियम क्र. ३४ (३.४), ३४ (३.५), ३४ (३.६) व नियम क्र.३५ आणि भाग क्र.१० मधील नियम क्र.५१, ५५ व ५६ तसेच परिशिष्ट – २ व जोडपत्रे तयार करण्यात आली आहेत. ही सर्व जोडपत्रे महापालिकेच्याwww.mcgm.gov.in या संकेतस्थळावर दिनांक ०८.०५.२०१६ पासून उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. भाग ६ मधील ३३ (१०) चे काम अंतिम टप्प्यात असून ते लवकरच प्रसिध्द केले जाईल.
भाग – ५ मध्ये चटईक्षेत्र निदेशांक, चटईक्षेत्र निदेशांक मुक्त आणि चटईक्षेत्र निदेशांकात परिगणन करण्याची क्षेत्रे, फंजिबल एफएसआय, विकास हस्तांतरण हक्क (टीडीआर). भाग – ६ विविध प्रकारच्या वापरांकरीता अतिरिक्त चटईक्षेत्र निदेशांक उदा. शैक्षणिक, वैद्यकीय वापर इत्यादी. भाग – ७ (भाग) – खाजगी /शासकीय / निमशासकीय / समुचित प्राधिकरणांच्या ना विकास पट्टयातील जमिनींचा विकास, ना विकास पट्टयात/नैसर्गिक क्षेत्रांमध्ये अनुज्ञेय वापर. भाग – ८ – इमारतींच्या भागांच्या आवश्यकता, भूखंडामध्ये इमारती सभोवती सोडावयाच्या मोकळया जागा, पार्कींग, विविध बाबतीत सक्षम व्यक्ती. भाग – १० (भाग) – पार्कींग प्राधिकरण, मेट्रो, वन जमिनी. याचा प्रसिद्ध केलेल्या भागांमध्ये खालील बाबींचा समावेश आहे.
वरील तपशिलानुसार महापालिकेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या `प्रारुप विकास नियंत्रण नियमावली` यातील भाग ५,६ मधील ३३(१०)वगळून, ८ व भाग ७ मधील नियम क्र. ३४ (३.४), ३४ (३.५), ३४ (३.६) व नियम क्र.३५ आणि भाग क्र.१० मधील नियम क्र.५१,५५ व ५६ तसेच परिशिष्ट – २ व जोडपत्रे बाबत संबंधितांना त्यांची निरीक्षणे (observations) १७ मे २०१६ पर्यंत नोंदविणयाचे आवाहन करण्यात आले आहे.
सदर निरिक्षणे ee.dpr.mcgm.dcr@gmail.com या इ-मेल वर कळवावयाची आहेत. तसेच पत्राद्वारे कळवावयाची झाल्यास खाली नमूद केलेल्या पत्त्यावर कळवावयाची आहेत. प्रमुख अभियंता (विकास नियोजन), ५ वा मजला, नवीन विस्तारीत इमारत, बृहन्मुंबई महापालिका मुख्यालय, महापालिका मार्ग, फोर्ट,मुंबई-४०० ००१. वरील नुसार निरिक्षाणे कळवितांना इ-मेल च्या `subject`मध्ये किंवा पत्राने कळवावयाचे झाल्यास पाकीटावर ``प्रारुप विकास नियंत्रण नियमावली २०१४-२०३४`` अथवा ``Draft DCR
2014-2034`` हे लिहिणे आवश्यक आहे.


No comments:
Post a Comment