प्रवाश्यांना न्याय देण्यासाठी यंत्रणा उभारा
मुंबई / प्रतिनिधी
ऑनलाईन बुकिंग करून खाजगी ट्रयावल्सवाल्यांकडू न प्रवाश्यांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत चालले असताना अश्या ट्रयावल्सवाल्यांवर राज्य सरकार आणि परिवहन विभागाचे कोणतेही नियंत्रण नसल्याने सामान्य नागरिकांना याची मोठी किंमत मोजावी लागत असल्याचे समोर आले आहे. प्रवाश्यांची खाजगी
ट्रयावल्सवाले पिळवणूक करत असताना प्रवाश्यांना कोणीही वाली नसल्याने सरकार आणि परिवहन विभागाने प्रवाश्यांना न्याय देण्यासाठी यंत्रणा उभारावी अशी मागणी केली जात आहे.
मुंबई ते रत्नागिरी प्रवास करण्यासाठी एका कुटुंबाने दिनांक ४ मे २०१६ ची साई ट्रयावल्सची दोन तिकिटे ऑनलाइन बुकिंग केली होती. बुकिंग केल्यावर दिलेल्या तिकिटात साई ट्रयावल्स असा उल्लेख आहे. या तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना १० वाजता चेंबूर मैत्री पार्क जवळील योगी हॉटेलजवळ थांबण्यास सांगण्यात आले होते. सदर प्रवाश्याने योगी हॉटेल जवळ येवून रात्री ९.५० वाजता तिकीटावरील साई ट्रयावल्सच्या ८६५५२१९९०१ या क्रमांकावर फोन केला असता तुम्ही बाजूलाच विजय ट्रयावल्सचे कार्यालय आहे तिथे थांबा असे सांगण्यात आले. विजय ट्रयावल्सजवळ जावून संबंधित प्रवाश्याने कार्यालयातील मुख्य इसमाला (दाडीवाला व सतत थोड्या वेळाने सिगारेट फुकणाऱ्या) दाखवले असता तुमची स्लीपरची तिकीट आहे, तुम्ही इथे थांबा असे सांगण्यात आले.
या नंतर सदर प्रवाश्यांनी दोन वेळा अजून गाडी आली नाही म्हणून फोन केला असता एक मिनिट थांबा असे सांगून फोन वरून कुठलेही उत्तर मिळालेले नाही. म्हणून पुन्हा विजय ट्रयावल्सच्या कार्यालयात विचारले असता तुमची साई ट्रयावल्स गाडी येईल थांबा असे सांगण्यात आले. रात्री ११. ३० पर्यंत वात बघूनही गाडी आली नाही म्हणून पुन्हा विचारणा केली असता तुमची औदुंबर ट्रयावल्स स्लीपर गाडी कधीच गेली असे सांगण्यात आले. आणि सदर कार्यालयातून गाडीच्या चालकाला फोन केला असता वाशीच्या पुढे गाडी गेल्याचे सांगितले. गाडी थाबावा आम्ही मागच्या गाडीने वाशी पर्यंत येतो असे सांगितले असता औदुंबर ट्रयावल्सच्या चालकाने गाडी थांबवणार नाही असे सांगत तुम्ही रिफंडसाठी कार्यालयाला भेटा असे सांगितले.
प्रवासी आपल्या कार्यलयासमोर रात्री ९.५० पासून उभे असताना दोन वेळा प्रवाश्याने विचारल्यावर आणि एक वेळा कार्यालयातील एका इसमाने तिकीट बघून साई ट्रयावल्सची स्लीपर गाडी असल्याचे सांगण्यात आले. प्रवाश्यांना औदुंबर ट्रयावल्सची गाडी येणार असे सांगण्यात आलेले नाही. औदुंबर ट्रयावल्सने संबंधित प्रवाश्यांचे आपल्या गाडीत तिकीट आहे असे माहित असल्यास त्यांच्या चालक किंवा संबंधित व्यक्तीने विजय ट्रयावल्सच्या कार्यालयासमोर येवून साई ट्रयावल्सने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांचे नाव घेतलेले नाही. साई ट्रयावल्सने प्रवास करणारे प्रवासी ८६५५२१९९०१ या क्रमांकावर फोन करत आहेत. त्या नंबरवर पुन्हा फोन करून गाडी दुसऱ्या ट्रयावल्सची येत असल्याचे सांगण्यात आलेले नाही. या प्रकारामुळे प्रवाश्यांचे आर्थिक नुकसान तर झाले वरून मनस्ताप सहन करावा लागला आहे.
विजय ट्रयावल्सच्या संबंधित व्यक्तीने गाडी चुकल्याने संतप्त झालेल्या प्रवाश्यांना गाडीतील चालकाचा ९७६९६७२२९१ नंबर रात्री ११.३० वाजता दिल्यावर प्रवाश्यांनी चालकाला संपर्क साधला असता चालकाने प्रवाश्यांना खोटे ठरवत आम्ही गाडी थांबवणार नाही असे उत्तर दिले. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाश्यांना विजय ट्रयावल्सच् या संबंधित व्यक्तीने दुसऱ्या गाडीने पुढे जा सांगितले. प्रवाश्यांनी आम्ही दुसऱ्या गाडीने पुढे जातो परंतू आमची गाडी पुढे थांबवायला सांगा असे सांगितले असता ते मी काही करू शकत नाही, तुम्ही ऑनलाईन बुकिंग केले आहे तुम्ही तुमचे काय ते बघून घ्या, असे सांगितले.
तसेच इतर गाड्यांमधील कर्मचाऱ्यांना या प्रवाश्यांना कोणतीही मदत करू नका असे सांगत कार्यालय बंद करून पळून जाणे पसंद केले. या प्रकाराबाबत विजय ट्रयावल्सच्या मालकाशी संपर्क करण्यासाठी २५२७१०१० या क्रमांकावर संपर्क साधला असता तुम्हाला काय छापायचे ते छापा आम्हाला काहीही फरक पडत नाही असे उत्तर दिले आहे. खाजगी ट्रयावल्सच्या गाड्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची फसवणूक होत असल्याने राज्य सरकार व परिवहन विभागाने खाजगी ट्रयावल्सवाल्या ंना चाप लावण्यासाठी नियम नियमावली बनवून, प्रवाश्यांना तक्रारी करण्यासाठी यंत्रणा उभारून प्रवाश्यांची होणारी फसवणूक थांबवावी अशी मागणी केली जात आहे.

No comments:
Post a Comment