मुंबई / प्रतिनिधी - रस्ते घोटाळ्यातील दोषी ठरवण्यात आलेल्या कंत्राटदारांनाच उड्डाणपुलाच्या बांधकामांचे कंत्राट देण्याचा प्रस्ताव सत्ताधारी शिवसेना भाजपा आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर केला. दोषी कंत्राटदाराना कामे देवू नए अशी मागणी विरोधी पक्षांनी केली तरीही सत्ताधाऱ्यानी बहुमाताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर केल्याने विरोधी पक्षानी सभात्याग केला.
रस्ते दुरुस्ती आणि पुर्नबांधणीबाबतच्या कामांची चौकशी करताना जे. कुमार इन्फ्रा आणि आर पी एस इन्फ्रा हे कंत्राटदारही दोषी आढळले आहेत. रस्ते घोटाळ्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असे असले तरी जे. कुमार इन्फ्रा कंत्राटदाराला अंधेरी उड्डाणपुल आणि हॅंकॉक ब्रिजच्या पुर्नबांधणीचे काम आणि आर पी एस इन्फ्रा कंत्राटदाराला मिठी नदी पुल आणि विक्रोळी रेल्वे ब्रीजच्या पुर्नंबांधणीचे काम देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
यावर विरोधी पक्षासोबत सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी दोषी कंत्राटदाराना काम देण्यास विरोध केला. मनसेचे सदस्य चेतन कदम यांनी दोषी कंत्राटदारांना हद्दपार करुन त्यांना कुठल्याही प्रकारची कामे देण्यात येवू नये अशी मागणी करत सभा तहकुबीची मागणी केली. मात्र कदम यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने कदम यांनी प्रस्तावाची प्रत फाडून सभात्याग केला.
विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा यांनीही दोषी कंत्राट दाराना कामे देवू नए, प्रस्ताव मंजूर करू नये, अशी मागणी केली. परंतू याचवेळी उड्डाणपुलाच्या कामांची जबाबदारी पालिका प्रशासन घेण्यास तयार असल्याचे स्पष्टीकरण अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी दिले. यावर स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी प्रस्ताव मतास टाकला. याचा निषेध करत विरोधी पक्षांनी सभात्याग केला.
कारणे दाखवा नोटीस दिली जाणारअतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सांगितले की, रस्ते कामांतील दोषी कंत्राटदारांना येत्या दोन चार दिवसात कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येणार आहे

No comments:
Post a Comment