मुंबई : रेल्वेच्या नव्या नियमानुसार नियमित गाड्यांचे आरक्षण चार महिन्यांआधीच सुरू करण्यात आले. गणपतीसाठी मोठ्या संख्येने कोकणात धाव घेणाऱ्या चाकरमान्यांनी या सेवेला तुफान प्रतिसाद दिला. ३ सप्टेंबरपासून कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण काही तासांतच फुल्ल झाले आहे.
चार महिने अर्थात १२० दिवसांआधी आरक्षण उपलब्ध केल्याने सहज आरक्षण उपलब्ध होईल, अशी शक्यता रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली होती. मात्र दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चाकरमान्यांनी कोकणातील गाड्यांचे आरक्षण केले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन गणेशोत्सवात कोकणासाठी किती जादा गाड्या सोडणार, याची प्रतीक्षा चाकरमान्यांना लागली आहे.
बहुसंख्येने कोकणवासीय गणेशोत्सवात रेल्वे सेवेचा वापर करतात. त्यासाठी चार महिने आधी आरक्षण सुरू केल्यास सोयीस्कर ठरेल, अशी अपेक्षा रेल्वे प्रशासनाला होती. मात्र कोकणवासीयांनी गाड्यांच्या आरक्षणाला चार महिन्यांआधीच दिलेल्या प्रतिसादाने ती फोल ठरली आहे.
गणेशोत्सवाच्या ३ ते ५ सप्टेंबर या कालावधीत कोकणाकडे धावणाऱ्या कोकणकन्या, राज्यराणी, जनशताब्दी आणि मांडवी एक्स्प्रेस या सर्व गाड्यांची प्रतीक्षा यादी ५००वर गेली आहे.
रेल्वे प्रशासनाकडून गणेशोत्सवात जादा गाड्या चालवण्यात येतात. मात्र तरीही कोकणवासीयांची पहिली पसंती याच गाड्यांना असते.
डबलडेकरला चांगला प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप नेहमीच होत असतो. मात्र गणेशोत्सवात डबलडेकर गाडीला चांगला प्रतिसाद मिळाला असून, ३००हून अधिक प्रतीक्षायादी असल्याची माहिती देण्यात आली आहे.
गाडीचे नाव दिनांकनिहाय प्रतीक्षायादीची सद्य:स्थिती
३ सप्टेंबर ४ सप्टेंबर ५ सप्टेंबर
एक्स्प्रेस ४०० (स्लीपर) ४०१ (स्लीपर) १७८(स्लीपर)
मांडवी ५२३ (स्लीपर) ४०१ (स्लीपर) ३० (स्लीपर)
कोकणकन्या ४०१ (स्लीपर) ४७८ (स्लीपर) २२ (स्लीपर)
जनशताब्दी ३९५ ४०१ १४७
दिवा-सावंतवाडी पॅसेंजर १०१ १०१ ८६

No comments:
Post a Comment