गिरणी कामगारांच्या घरांची आज सोडत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गिरणी कामगारांच्या घरांची आज सोडत

Share This
मुंबई : सोमवारी (९ मे) सकाळी १० वाजता वांद्रे पश्चिमेकडील रंगशारदा सभागृहात गिरणी कामगारांसाठीच्या २ हजार ६३४ घरांकरिता लॉटरी काढण्यात येणार आहे. एकूण सहा गिरण्यांच्या गिरणी कामगारांच्या सदनिकांची लॉटरी काढण्यात येणार असून, यामध्ये भारत मिल, वेस्टर्न इंडिया मिल, सेंच्युरी मिल, प्रकाश कॉटन मिल, रुबी मिल आणि स्वान मिल ज्युबली या गिरण्यांचा समावेश आहे. 
ज्या गिरणी कामगाराने ज्या गिरणी संकेत क्रमांकांची माहिती दिली आहे; त्याच संकेत क्रमांकासाठी अर्जदाराची सोडत काढली जाणार आहे. गिरणी कामगार पती/पत्नी/वारसांपैकी मूळ गिरणी कामगार अथवा त्यांच्या वारसांचा एकाच सदनिकेसाठी विचार करण्यात येणार आहे. एकापेक्षा अधिक अर्जांचा वितरणासाठी विचार केला जाणार नाही. महत्त्वाचे म्हणजे लॉटरी, निश्चिती आणि सदनिका वितरणाची कार्यवाही शासनाच्या आदेशानुसार केली जाईल, असे म्हाडातर्फे सांगण्यात आले. दरम्यान, संगणकीय सोडतीमध्ये कोणत्याही प्रकाराचा मानवी हस्तक्षेप होऊ शकत नाही. म्हाडाने दलाल नेमलेले नाहीत. त्यामुळे अर्जदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये,असे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages