मुंबईत जकात चुकवून आणलेली 200 किलो चांदी पकडली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत जकात चुकवून आणलेली 200 किलो चांदी पकडली

Share This
मुंबई / प्रतिनिधी - मुंबईमधे जकात न भरता आणलेली 200 किलो चांदी मुंबई महानगरपालिकेच्या दक्षता विभागाने पकडली आहे. मुंबई पनवेल मार्गावर असलेल्या जकात नाक्यावर जकात न भरता MH 04 ET 4848 ही गाडी मुंबईमधे दाखल झाली होती. ही गाडी पालिकेच्या पालिकेच्या दक्षता विभागाने फ्री वे जवळ वाडी बंदर येथे पकडली. या चांदीची किंम्मत 70 लाख रुपये आहे. 


ही कारवाई दक्षता विभागाचे प्रमुख सुरक्षा अधिकारी अभय चौबल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पालिका चांदीवर 1 टक्का जकात घेते. जकात न भरल्यास 10 पट दंड वसूल केला जातो. या प्रकरणी अतरिक्त आयुक्त संजय मुखर्जी, उपायुक्त बी जी पवार, कर निर्धारन आणि संकलन विभागाचे प्रमुख संजोग कबरे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करण्यात येत असून पुढील कारवाई केली जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages