नालेसफाई दरम्यान घर कोसळले > तीन जखमी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नालेसफाई दरम्यान घर कोसळले > तीन जखमी

Share This
मुंबई - नालेसफाई दरम्यान चक्क घर कोसळल्याची दुर्घटना गोवंडी येथे घडली आहे. या दुर्घटनेत तीनजण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका 7 वर्ष मुलाचाही समावेश आहे. गोवंडी येथील बैंगनवाडीतील रोड नंबर 11 जवळील प्लॅट नंबर 25 येथे हनुमान मंदीर जवळील प्रेम शंकर गुप्ता यांच्या मालकीचे  घर नालेसफाईचे काम सुरु असताना कोसळले. गुप्ता यांच्या घरा शेजारी नाले सफाईचे व रस्त्याच्या बांधकामाचे काम सुरु होते  याच दरम्यान, मंगळवारी सकाळी 11.30 च्या दरम्यान घर कोसळून फैजल अब्दुल लतीफ शेख वय 26 वर्षे, उमर अब्दुल ल तीफ शेख वय 23 वर्षे आणि जमीला अब्दुल लतीफ शेख वय 7 वर्षे हे तिघे जखमी झाले आहेत. यापैकी उमर याला 7 टाके तर  जमीला याला 3 टाके पडले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages