विक्रोळी येथील आगीत दोन जवान जखमी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विक्रोळी येथील आगीत दोन जवान जखमी

Share This
मुंबई - विक्रोळी पार्क साईट येथील अहील्लाबाई होळकर मार्गावरील एका हार्डवेअर दुकानाला लागलेल्या आगीत अग्निशमन दलाचे  जवान जखमी झाल्याची घटना आज घडली. हार्डवेअर दुकानाला लागलेली आग ही शॉर्टसर्कीटमुळे लागल्याचे बोलले जात आहे. आग विझविण्यासाठी घटना स्थळी  अग्निशमन दलाच्या दोन फायर इंजिन पोहचल्या होत्या. आग विझविताना अग्निशमन दलाचे जवान घनश्याम परब, 45 आणि  नाना सर्जेराव व्यवहारे, 25 हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर मुलंुड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages