एकनाथ खडसे यांच्यावर कडक कारवाई करून अटक करा व जेलमध्ये टाका – संजय निरुपम - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

एकनाथ खडसे यांच्यावर कडक कारवाई करून अटक करा व जेलमध्ये टाका – संजय निरुपम

Share This
मुंबई / प्रतिनिधी - एकनाथ खडसे यांनी आज राजीनामा दिला पण तेवढे करून चालणार नाही, त्यांच्यावर कारवाई करून अटक करा व जेलमध्ये टाका. एकनाथ खडसेंनी राजीनामा दिला हे संपूर्णतः काँग्रेसच्या आंदोलनाचे यश आहे. पण त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय कॉंग्रेस गप्प बसणार नाही. एकनाथ खडसे यांच्यावर मोक्का कायदा अंतर्गत तसेच भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्यावर कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकत नाहीत. तो पर्यंत काँग्रेसचे आंदोलन सुरूच राहणार आहे, असे उद्गार मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी ‘धिक्कार मोर्चा’ला संबोधताना काढले. आज मुंबई काँग्रेसतर्फे शिवसेना भाजपच्या विरोधात ‘धिक्कार मोर्चा’ काढण्यात आला होता.   


संजय निरुपम पुढे म्हणाले की भाजपा शिवसेना सरकार मध्ये ७ मंत्री भ्रष्टाचारामध्ये अडकलेले आहेत. एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, दीपक सावंत, रणजीत पाटील, बबनराव लोणीकर आणि चन्द्रशेखर बावनखुळे या सगळ्यांवर कारवाई करून जेलमध्ये टाकल्याशिवाय मी व काँग्रेस गप्प बसणार नाही. या सातही भ्रष्ट मंत्र्यांवर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर घुसणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांना जागे करून कारवाई करण्यास भाग पाडणार आहोत.

ते पुढे म्हणाले की मुंबई महानगरपालिकेत प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. नाले सफाई घोटाळा, टॅबलेट घोटाळा, रस्ते बांधणी घोटाळा, खड्डे दुरुस्ती घोटाळा, डम्पिंग ग्राउंड घोटाळा असे अनेक घोटाळे झालेले आहेत. हजारो कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे. भाजपचेच खासदार किरीट सोमय्या म्हणाले आहेत की मुंबई महानगरपालिकेत माफियाराज सुरु आहे. या माफियाराजला बान्द्राचे एक साहेब त्याचा म्हेवना व त्यांचाच खाजगी सचिव जबाबदार आहे. किरीट सोमय्या यांनी यांची नावे जाहिर करावे व त्यांच्यावर हि कारवाई करून अटक करावी, अशी आमची मागणी आहे. आमची दुसरी मागणी आहे की मुंबई महानगरपालिका बरखास्त करावी. मुंबई महानगरपालिकेत प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. मुंबईकरांना मुबलक पाणी, स्वच्छता, नाले सफाई, डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सोडविण्यात शिवसेना भाजपा सरकार संपूर्णतः अपयशी ठरलेली आहे. त्यामुळे मुंबईकर निराश झालेले आहेत. तेव्हा मुंबई महानगरपालिका बरखास्त करावी. 

कॉंग्रेसतर्फे फॅशन स्ट्रीट ते आझाद मैदान येथे धिक्कार मोर्चा काढण्यात आला. या धिक्कार मोर्चाला माजी खासदार एकनाथ गायकवाड, आमदार असलम शेख, वर्षा गायकवाड, अमिन पटेल, भाई जगताप, माजी आमदार चरणसिंग सप्रा, अशोक जाधव, शाम सावंत तसेच सरचिटणीस भूषण पाटील व संदेश कोंडविलकर तसेच नगरसेवक/ नगरसेविका व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages