खडसेंवरील आरोपांची न्यायालयीन चौकशी करा!: खा. अशोक चव्हाण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

खडसेंवरील आरोपांची न्यायालयीन चौकशी करा!: खा. अशोक चव्हाण

Share This
मुंबई, दि. 4 जून 2016:
एकनाथ खडसे यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला असला तरी हे प्रकरण केवळ एवढ्यावरच थांबणार नाही. त्यांच्यावरील सर्व आरोपांची तातडीने न्यायालयीन चौकशी सुरू झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.


भष्ट्राचाराच्या अनेक गंभीर आरोपानंतर महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना खा. चव्हाण म्हणाले की, मुळातच खडसे यांचा राजीनामा घेण्यात प्रचंड विलंब झाला. नैतिकता म्हणून त्यांनी यापूर्वीच राजीनामा द्यायला हवा होता. खडसे यांच्यावर दाऊद इब्राहिमशी संबंध असल्यापासून भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी करण्यापर्यंत अनेक गंभीर आरोप लागले होते. हे आरोप केवळ राजीनाम्याने संपणार नाहीत. सत्य जनतेसमोर आणून ही प्रकरणे तडीस नेण्यासाठी सरकारने या सर्व प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करणे गरजेचे आहे. प्रारंभी सरकार या आरोपांची दखल घ्यायलाच तयार नव्हते. परंतु, काँग्रेस पक्षाने सातत्याने हा विषय लावून धरला. आंदोलने केली. इतरही अनेक संस्था व व्यक्ती तसेच मीडियाने प्रकरण उचलून धरले. त्यामुळे प्रचंड दबाव निर्माण झाला व त्यातून खडसेंना राजीनामा द्यावा लागला, असेही खा. चव्हाण यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages