महिला बचतगटांच्या उत्पादनासाठी ‘मुंबई हाट’ उपक्रम - मुख्यमंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महिला बचतगटांच्या उत्पादनासाठी ‘मुंबई हाट’ उपक्रम - मुख्यमंत्री

Share This
मुंबईदि. 20 : महिला बचतगटांनी तयार केलेल्या उत्पादनांचा ब्रॅण्ड प्रस्थापित करण्यासाठी मुंबई हाट’ या प्रायोगिक तत्वावरील उपक्रमातून महिला बचतगट मॉल सुरु करण्यात येणार आहेअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. महिला बचतगटांना मुंबई येथे सब-वे मॉल सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यावेळी उपस्थित होते.


राज्यातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या उत्पादनांची महिलांनीच विक्री करणे या उद्देशातून राज्याच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग आणि यूएनडीपीच्या दिशा प्रकल्पामार्फत ‘मुंबई हाट’ हा उपक्रम सुरु करण्यात येत आहे. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून तयार करण्यात आलेल्या मेट्रो सिनेमाच्या भुयारी मार्गामध्ये बचतगटांना आपली उत्पादने विक्री करण्यासाठी स्टॉल्स उभारुन देण्यात येणार आहे. या भुयारी मार्गामध्ये नऊ मार्गिका असून या ठिकाणी डिजिटल म्युझियम,दाग-दागिनेगृह सजावटीच्या वस्तूसेंद्रीय पध्दतीने बनविलेले खाद्य पदार्थसेल्फी झोन अशा वेगवेगळे प्रकारचे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. ‘मुंबई हाट’च्या माध्यमातून बचतगटांनी तयार केलेल्या उत्पादनांकडे परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे.
            
मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले की‘मुंबई हाट’ हा प्रायोगिक तत्वावरचा प्रकल्प आठवड्यातून चार दिवस राबविण्यात यावा. दक्षिण मुंबईप्रमाणेच उपनगरांमध्येही अशाप्रकारचा प्रकल्प सुरु करावा जेणेकरुन बचतगटांच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळू शकेल. हा मॉल सुरु झाल्यावर त्या ठिकाणी पहिल्या दिवसापासून स्वच्छतेची निगा राखली जाईल याकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही याचीही काळजी घेणे आवश्यक राहील. अशा प्रकारचे महिला बचतगट मॉल ठिकठिकाणी सुरु झाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. दरवर्षी सरस प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळतो. महिला बचतगट मॉलच्या माध्यमातून सरस प्रदर्शन वर्षभर सुरु ठेवून प्रत्येक जिल्ह्यात एक आठवडा हे प्रदर्शन भरविण्याबाबत विचार करावा असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
            
यावेळी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांनी ‘मुंबई हाट’ या उपक्रमाबाबत सादरीकरण केले. आधुनिक वातावरणात स्वदेशी उत्पादनांची विक्री आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख या माध्यमातून केली जाणार आहे. खाजगी क्षेत्र व शासकीय विभागांच्या माध्यमातून ‘मेक इन महाराष्ट्र’ ब्रॅण्ड ‘मुंबई हाट’च्या माध्यमातून विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे श्री. कपूर यांनी सांगितले.
            
यावेळी मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहतामहिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव संजय कुमारनगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीरपर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर-सिंहमुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आय. एस. कुंदनकौशल्य विकास विभागाचे आयुक्त विजय वाघमारे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages