एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीसाठी ऑफलाईन प्रवेश सुरु - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीसाठी ऑफलाईन प्रवेश सुरु

Share This
मुंबईदि. 20 : एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ही शासकीय संस्था असून या संस्थेत शैक्षणिक वर्ष 2016-17 करिता 10+2 स्तरावरील द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम व्होकेशनल सायन्समध्ये इयत्ता अकरासाठी ऑफलाईन पध्दतीने प्रवेश सुरु आहेत.


इलेक्ट्रिकल मेंटेनन्स (A1), मॅकेनिकल मेटेनन्स (A2),स्कूटरमोटार सायकल दुरुस्ती (A3) तसेच इलेक्ट्रॉनिक्स (C1) या विषयांच्या इंग्रजी माध्यमातून उपलब्ध असलेल्या प्रत्येकी एकूण 50 जागेसाठी 1665 रुपये इतके वार्षिक शुल्क आहे. हा व्यवसाय अभ्यासक्रम घेऊन इयत्ता 12वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी उच्च शिक्षणाकरिता अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेसाठी (JEE MAINS) तसेच डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेशासाठी पात्र ठरु शकतात. प्रवेश अर्ज विक्री व स्वीकृती संस्थेच्या कार्यालयात सुरु असून इच्छुकांनी एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, 3,महापालिका मार्गधोबी तलावमुंबई-1 येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे संस्थेच्या मुख्याध्यापकांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages