सरकारी कर्मचार्‍यांना सातवे वेतन आयोग लागू, ‘छप्पर फाडके’ पगारवाढ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सरकारी कर्मचार्‍यांना सातवे वेतन आयोग लागू, ‘छप्पर फाडके’ पगारवाढ

Share This
दिल्ली – 29 जून : केंद्रीय कर्मचार्‍यांचे अखेर अच्छे दिन आले आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आलीये. सातव्या आयोगामुळे केंद्रीय कर्मचार्‍यांना भरघोस पगारवाढ मिळणार आहे. पेन्शनधारकांनाही याचा लाभ मिळेल. केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारात कमीतकमी 23 टक्क्यांची वाढ होणार आहे. याच फायदा अर्थातच लाखो कर्मचार्‍यांना होणार आहे. या घोषणेमुळे सरकारच्या तिजोरीवर तब्बल 25 हजार कोटींचा बोजा पडणार आहे.


केंद्र सरकारने अखेर सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीची अंमलबजावणी केलीये. या वर्षीच्या अर्थसंकल्पात वेतन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी तब्बल 70,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. एकूण 23.55 टक्के वाढीमध्ये भत्त्यांतील वाढही समाविष्ट आहे. निवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांच्या पेंशनमध्ये जवळपास 24 टक्क्यांनी वाढ होणार आहे.

सातव्या वेतन आयोगाचा निर्णय झाल्यामुळे ऑगस्ट महिन्यात कर्मचार्‍यांच्या हातात वाढीव पगार मिळणार आहे. गेल्या 70 वर्षांतील ही सर्वात मोठी वेतन वाढ आहे. ज्यांचा मुळ पगार हा 7 हजार असेल त्यांच्या पगार आता 18 हजारांवर पोहचणार आहे. ज्यांचा मुळ पगार 13,500 आहे अशांचा पगार आता 40,500 रुपये असणार आहे. जवळपास तीनपट ही पगार वाढ आहे. पण, या घोषणेचा बोजा जनतेवर पडणार आहे.

आयोगाच्या शिफारशी
- किमान मूळ वेतन 18 हजार
- कमाल 2.5 लाख रुपये
- मूळ वेतन तीनपटीनं जास्त, पेन्शनमध्ये 24 टक्के वाढ?
- ग्रॅज्युएटीची मर्यादा 10 लाखांवरून 20 लाख ?

किती वाढेल मूळ वेतन?- 7 हजारांवरून 18 हजार
- 13,500 वरून 40,500 रुपये
- 21 हजारांवरून 63 हजार
- 46,100 वरून 1,38,300 रुपये
- 80 हजारांवरून 2,20,000 रुपये
- 90 हजारांवरून 2,50,000 रुपये

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages