वीज खंडित झाल्याने मुंबईकरांचे हाल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

वीज खंडित झाल्याने मुंबईकरांचे हाल

Share This
मुंबई / प्रतिनिधी 29 June 2016
बुधवारी मुंबई उपनगरात सकाळपासून वीज सेवा खंडित झाल्याने मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला. वीज पुरवठा टाटा पॉवरच्या ट्रांसमिशन टावरमुळे खंडित झाल्याचा दावा रिलायंस एनर्जी कंपनीने केला आहे. टाटा पॉवरकडे अश्या परिस्थितीत कोणतीही इमरजेंसी व्यवस्था नसल्यामुळे सामान्य नागरिकांना झालेला त्रास पहाता आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागणी केली आहे की टाटा पॉवर आणि रिलायंस एनर्जीने स्वत:ची बैकअप व्यवस्था तयार ठेवणे गरजेचे आहे.


मुंबईत वीज पुरवठा करणारी रिलायंस एनर्जीचे हजारों ग्राहक सकाळपासून वैतागले होते. वीज गेल्यानंतर रिलायंस एनर्जीचा क्रमांक सतत व्यस्त होता. अनिल गलगली यांनी रिलायंस एनर्जीच्या ट्विटरवर तक्रार केली आणि त्यानंतर रिलायंस एनर्जीने स्पष्ट केले की ऐरोली येथील टाटा पॉवर यांचे 220केवी ट्रांसमिशन टावर क्षतिग्रस्त झाले असून रिलायंस एनर्जी ही वीज पुरवठा पूर्ववत सुरु करण्यासाठी सतत टाटा टावरच्या संपर्कात आहे. अनिल गलगली यांच्या मते या वीज कंपनीच्या निष्कृठ सेवेमुळे सामान्य वीजग्राहकांस त्रास सहन करावा लागतो. राज्य शासनाने या बाबीची गंभीर दखल घेत दोन्हीं कंपनीस अश्या परिस्थितीत बैकअप व्यवस्था करण्यास भाग पाडावे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages