Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

महानगरपालिकांना डंपिंगसाठी परवानगी नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कल्याण दि 17: यापुढे कोणत्याही महानगरपालिकांना डंपिंगसाठी परवानगी मिळणार नाही हे स्पष्ट करून त्यांनी कचऱ्याच्या शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी यंत्रणा उभारावी अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. कल्याण डोंबिवलीत ठाण्या प्रमाणेच क्लस्टर डेव्हलपमेंट आणि एसआरए लागू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असेही ते म्हणाले. कल्याण येथे आयोजित स्मार्ट सिटी शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कल्याण येथे आयोजित स्मार्ट सिटी शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

विश्वासार्हकार्यक्षम ,पारदर्शी आणि सर्वसमावेशक प्रशासन हाच स्मार्ट शहरांच्या विकासाचा पाया असून महाराष्ट्रातील 10 शहरे केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेच्या धर्तीवरच विकसित करण्यात येऊन त्याना आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. ते आज कल्याण येथे आयोजित स्मार्ट सिटी शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री एकनाथ शिंदेगृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतामहापौर राजेंद्र देवळेकरखासदार कपिल पाटीलखासदार डॉ श्रीकांत शिंदेदेना बँकेच्या संचालिका तृष्णा गुहाएमएमआरडीए आयुक्त युपीएस मदानजिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकरकल्याण डोंबिवली मनपा आयुक्त ई. रविंद्रनटर्की देशाचे वाणिज्यदूत एर्दल एर्गेन उपस्थित होते. यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मोबाईल एपचे तसेच ई-गव्ह या मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Voter Information & Services

Ads Bottom