मुंबई, दि. 17 : प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) येथे दुचाकी वाहनांसाठी MH-01-CK ही नवीन मालिका सुरु करण्यात आली असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी,मुंबई (मध्य) यांनी दिली आहे.
वाहनधारकांना या मालिकेमध्ये उपलब्ध असलेले पसंतीचे क्रमांक आवश्यक ते शुल्क भरुन घेता येतील. नवीन मालिकेतील वाहन क्रमांक आरक्षित करण्यासाठी फोटो असलेले ओळखपत्र,निवासाचा पुरावा, पॅनकार्ड व वाहन खरेदीची पावती ही कागदपत्रे आवश्यक आहेत. कार्यालयीन विहित नमुन्यातील अर्जान्वये कोणताही उपलब्ध वाहन क्रमांक आरक्षित करता येईल. आरक्षित केलेल्या वाहन क्रमांकाची वैधता 30 दिवसांसाठी राहील. जनतेच्या सुलभ माहितीसाठी व्हीआयपी वाहन क्रमांक व त्याचे शुल्क एलईडी स्क्रीनवर दर्शविण्यात येत आहे. त्याचबरोबर याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली असल्याची माहितीही प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई (मध्य) यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
No comments:
Post a Comment