वृक्षलागवडीसाठी आता शाळांचाही सहभाग - जनजागृतीसाठी शाळांमार्फत विद्यार्थ्यांची रॅली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

वृक्षलागवडीसाठी आता शाळांचाही सहभाग - जनजागृतीसाठी शाळांमार्फत विद्यार्थ्यांची रॅली

Share This
मुंबई, दि.23 :  दोन कोटी झाडे लावण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आला असून शालेय शिक्षण विभागानेही या कार्यक्रमात पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी शाळांमार्फत विद्यार्थ्यांची रॅली आयोजित करण्यात येणार असूनपहिले पाऊलवृक्ष लावून’ हे घोषवाक्य वापरावे असे आवाहन शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.


येत्या 1 जुलै 2016 रोजी होणाऱ्या दोन कोटी वृक्ष लागवडीबाबतच्या जनजागृतीसाठी शाळेत विद्यार्थ्यांची रॅली आयोजित करण्यात येत आहे. वृक्ष लागवड कार्यक्रमाचे प्रभावीपणे ऑनलाईन सनियंत्रण होण्यासाठी अपर प्रधान मुख्य वन संरक्षक यांच्यामार्फत आवश्यक आज्ञावली विकसित करण्यात आल्या आहेत. 1 ते 7 जुलै2016 या वन महोत्सव कालावधीत तसेच दिनांक 1 जुलै 2016 या दिवशी राज्यातील शाळांच्या आवारात आणि शालेय शिक्षण विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या आवारात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. याबाबतचे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्याwww.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेताक 201606181558290821 असा आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages