राज्य क्रीडा विकास समितीच्या रचनेत सुधारणा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज्य क्रीडा विकास समितीच्या रचनेत सुधारणा

Share This
मुंबई, दि. 23 :  महाराष्ट्र राज्याचे ‘क्रीडा धोरण 2001’ अंतर्गत राज्य क्रीडा विकास समिती स्थापन करण्यात आली असून या समिती रचनेत सुधारणा करण्यात आली आहे. वित्त विभागाचे प्रधान सचिव किंवा त्यांचे प्रतिनिधी,नियोजन विभागाचे प्रधान सचिव किंवा त्यांचे प्रतिनिधीनगर विकास विभागाचे प्रधान सचिव किंवा त्याचे प्रतिनिधी आणि महसूल विभागाचे प्रधान सचिव किंवा त्यांचे प्रतिनिधी आता राज्य क्रीडा विकास समितीमध्ये असतील.

महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण 2001 अंतर्गत प्रचलित योजनांमध्ये योग्य त्या सुधारणा करणेनवीन धोरणांतर्गत अभिप्रेत असलेल्या योजनांना मान्यता देणेविभागाच्या क्रीडा सुविधा हाती घेणेक्रीडा योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे अशी कामे या समितीमार्फत करण्यात येतात. या समितीच्या प्रत्येक बैठकीस संबंधित विभागाचे प्रधान सचिव/ सचिव यांना उपस्थित राहणे शक्य होत नाही म्हणून त्यांचे प्रतिनिधी म्हणून संबंधित सहसचिव/ उपसचिव यांची प्रतिनिधी म्हणून या समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्याबाबतची दुरुस्ती करण्यात आली आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्याwww.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संकेताक 201606231123110121 असा आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages