डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण केंद्र उभारण्यासंदर्भात तत्काळ कार्यवाही व्हावी - राजकुमार बडोले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण केंद्र उभारण्यासंदर्भात तत्काळ कार्यवाही व्हावी - राजकुमार बडोले

Share This
मुंबई, दि. २९ : शासकीय प्रौढ मूकबधीर प्रशिक्षण केंद्राची जागा विकसित करुन तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण केंद्र तसेच वसतिगृहकर्मचारी निवासस्थाने बांधण्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज दिले.


उल्हासनगर येथे नव्याने प्रशिक्षण संस्था बांधण्यासंदर्भात आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बडोले बोलत होते. या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुरेंद्र बागडेआमदार डॉ.बालाजी किणीकरसमाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवारठाण्याचे सहायक आयुक्त उज्वला सपकाळेठाणे जिल्हा समाज कल्याण अधिकारी रविकिरण पाटीलशासकीय प्रौढ प्रशिक्षण केंद्राचे प्रतिनिधी एम. डी. जामुनकरबार्टीचे संचालक हंबीरराव कांबळे आदी उपस्थित होते.

उल्हासनगर येथील शासकीय प्रौढ मूकबधीर प्रशिक्षण केंद्राची इमारत मोडकळीस आली असूनया जागेची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था, पुणे यांनी केली होती. या जागेवर नवीन प्रस्तावानुसार प्रशिक्षण कार्यालय, वसतिगृहकर्मचारी निवासस्थान बांधण्यात येणार आहे. यासंदर्भातील कार्यवाही त्वरित करण्यात यावी, असे निर्देश श्री. बडोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages