भाषा सल्लागार समिती अंतर्गत स्थापन केलेल्या उपसमितीची पुनर्रचना - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भाषा सल्लागार समिती अंतर्गत स्थापन केलेल्या उपसमितीची पुनर्रचना

Share This
मुंबई दि 17: महाराष्ट्राच्या राजभाषा मराठीचे पुढील 25 वर्षांचे धोरण ठरविण्यासाठी भाषा सल्लागार समितींतर्गत स्थापन उपसमितीची पुनर्रचना करण्यात आली आहे.

मराठी भाषेचे पुढील 25 वर्षासाठीचे धोरण ठरविण्यासाठी मसुदा तयार करण्याकरिता प्रा.नागनाथ कोतापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली भाषा सल्लागार समितींतर्गत उपसमिती स्थापन करण्यात आली होती. दिनांक 5 ऑगस्ट 2015 च्या शासन निर्णयानुसार भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षांनी या समितीची पुनर्रचना केल्यामुळे या समितींतर्गत उपसमितीचीही पुनर्रचना करण्यात आली आहे.
भाषा सल्लागार समिती अंतर्गत उपसमितीमध्ये सदानंद मोरे हे अध्यक्ष असून अनिल गोरे हे समन्वयक आणि सदस्य असणार आहेत. ॲड. दीपक गायकवाडडॉ.प्रकाश परबडॉ.दिलीप धोंडगेमाधव जोशीप्रा.संतोष क्षीरसागरस्वाती राजे आणि डॉ. सुजाता महाजन हे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. सदर उपसमितीच्या पुनर्रचनेस 5 ऑक्टोबर 2015 पासून मान्यता देण्यात आली आहे. हा निर्णय महाराष्ट्र शासनाच्याwww.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक 201606141322151333 असा आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages