मुंबई, दि. 17 : मातंग समाजातील सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या विकास होण्यासाठी सामाजिक, कलात्मक व साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येतो. 2016-17 या वर्षासाठीच्या पुरस्कारासाठी 30 जून 2016 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
समाजातील इतर संस्था वा समाजसेवकांना यापासून प्रेरणा मिळावी हा शासनाचा उद्देश असून, मुंबई उपनगर जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या 50 वर्षावरील पुरुष व 40 वर्षावरील महिला या पुरस्कारासाठी अर्ज करू शकतात. इच्छुकांनी पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र,केलेल्या कार्याबद्दल वर्तमानपत्रातील कात्रणे, प्रशस्ती पत्रके, पोलिस दाखला इत्यादी माहितीसह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर यांचे कार्यालय, प्रशासकिय इमारत, आर.सी.मार्ग, चेंबूर, मुंबई येथे तीन प्रतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment