दलितांबद्दल घृणास्पद वक्तव्य करणाऱ्या आमदार रविंद्र चव्हाण चा रिपाइं कडून तीव्र निषेध - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दलितांबद्दल घृणास्पद वक्तव्य करणाऱ्या आमदार रविंद्र चव्हाण चा रिपाइं कडून तीव्र निषेध

Share This
मुंबई दि 23 -  दलित पद दलितांबद्दल बोलताना आमदार रविंद्र चव्हाण यांनी अत्यंत घृणास्पद  वक्तव्य  केले त्याचे वृत्त दैनिक सम्राट मुळे उघडकीस आले आमदार म्हणून बोलताना रवींद्र चव्हाण यांनी  कल्याणमध्ये दलितांबद्दल केलेले वक्तव्य त्यांच्या विवेकबुद्धीला काळे फासणारे अत्यंत घृणास्पद आहे  

या देशात दलितांची शौर्याची परंपरा राहिली आहे दलितांचा अवमान करणारे  निंदनीय वक्तव्य केल्याबद्दल आमदार रविंद्र चव्हाण यांचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने  खासदार रामदास आठवले यांनी तीव्र निषेध केला आहे. दलितांच्या विरुद्ध गरळ ओकणारा;दलितांचा अवमान करणारा कुणी हि असो कोणत्याही पक्षाचा असो  दलितांचा दुःस्वास करणाऱ्या प्रवृत्तीला ठेचून काढले पाहिजे  आमदार रविंद्र चव्हाण यांनी दलितांबद्दल केलेल्या घृणास्पद वक्तव्य प्रकरणी त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केली आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages