हाळगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

हाळगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय

Share This
मुंबई २८ जून २०१६ - राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील हाळगाव (ता. जामखेड) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास आजच्या मंत्रिपरिषदेत मान्यता देण्यात आली.

            
क्षेत्रफळ आणि लोकसंख्येनुसार मोठा असलेल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये शेतीखालील क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे या जिल्ह्यात कृषी महाविद्यालय स्थापन झाल्यास कृषी विकासाला चालना मिळण्याबरोबरच स्वयंरोजगार आधारित कुटीर उद्योग उभे करण्यासाठी स्थानिक पातळीवर मनुष्यबळ निर्माण होईल. त्याचप्रमाणे या भागातील शेतकऱ्यांना कृषी सेवा व सल्ला उपलब्ध होऊन शेतीचे उत्पादन वाढण्यास देखील मदत होणार आहे.
            
या महाविद्यालयासाठी आवश्यक असणाऱ्या 64 शिक्षकवर्गीय व 37 शिक्षकेतर अशा 101 पदांच्या निर्मितीसाठी उच्चस्तर समितीची मान्यता घेऊन मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. पुढील पाच वर्षात या महाविद्यालयासाठी येणारा सादर करण्याचे आदेशही यावेळ ीदे श्यक असणाऱ्या पदांच्या निर्मिस3059.92 लाख आवर्ती खर्च आणि 3509.78 लाख अनावर्ती खर्च असा एकूण 6569.70 लाख रुपयांच्या खर्चाच्या अतिरिक्त नियतव्ययासही मान्यता देण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages