मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात टाळण्यासाठी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करा - मुख्यमंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात टाळण्यासाठी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करा - मुख्यमंत्री

Share This
मुंबईदि. ७ : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भविष्यात अपघात होणार नाहीतयाकडे अधिक लक्ष देऊन सुरक्षेच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.
मंत्रालयात आयोजित मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील रस्ता सुरक्षाविषयक आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटीलसार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदेराज्यमंत्री प्रविण पोटे-पाटीलराज्यमंत्री विजय देशमुख आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेवेगाने वाहन चालवणारे,वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करा. वर्षाचे ३६५ दिवस आणि दिवसाचे २४ तास वाहतुकीवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. अपघात घडल्यास अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळाली पाहिजे. भविष्यात अधिक सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने नियोजन करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. 

प्रारंभी राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी सादरीकरण केले. आढावा बैठकीला वाहतूक शाखाराज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages