मुंबई : बेस्ट समितीमध्ये मंजूर होऊन तब्बल एक महिना उलटल्यानंतर पालिका सभागृहात भाडेकपातीवर शिक्कामोर्तब झाले.त्यानुसार साध्या आणि वातानुकूलित बसपास व वातानुकूलित बसभाड्यात कपात होणार आहे़.शिवसेना भाजपाला कचाट्यात पकडण्यासाठी हा प्रस्ताव सभागृहात सादर करत नव्हती. परंतू शिवसेनेच्या महापौर दौऱ्यावर असताना उपमहापौर भाजपाच्या असल्याची संधी साधत भाजपाने हा प्रस्ताव सभागृहात मंजूर करून घेतला आहे.
बस भाड्यात कपात करण्याची घोषणा करीत गेल्या महिन्यात भाजपाने बेस्ट समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर केला़ त्यानंतर गेला महिनाभर भाडेकपातीचा प्रस्ताव पालिका सभागृहात मंजुरीच्या प्रतीक्षेत होता़ हे भाडेकपातीचे श्रेय भाजपाला जाणार असल्याने शिवसेनेने हा प्रस्ताव लांबणीवर टाकण्यात आल्याचे भाजपाच्या गोटातून सांगण्यात येते़. बस मार्गांमध्ये नव्या टप्प्यांचा समावेश करून भाडे कमी केल्याचे भाजपा भासवत असल्याचाही आरोप करण्यात येत होता़ ही कपात म्हणजे धूळफेक असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी केला़ मात्र महापौर स्नेहल आंबेकर या दौऱ्यावर असल्याने त्यांच्या गैरहजेरीत उपमहापौर अलका केरकर पिठासीन अधिकारी होत्या़. केरकर या भाजपाच्या असल्याने भाजपाने संधी साधून बेस्टच्या भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या सभागृहात मंजूर करून घेतला. त्यानुसार वातानुकूलित बसभाड्यात ५० टक्के कपात, दैनंदिन पास दोनशे रुपयांवरून दीडशे रुपये तर मासिक व त्रैमासिक पासाच्या रकमेत ३० ते १२५ रुपये कपात झाली आहे़.
No comments:
Post a Comment