‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

Share This
मुंबईदि. 23 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र कार्यक्रमात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दिनांक 24जून आणि मंगळवार दि. 28 जून रोजी सायंकाळी 7.25 ते 8.10 या वेळेत प्रसारित होईल. 1 जुलै रोजी राज्यभर साजऱ्या होणाऱ्या कृषी दिन आणि वन महोत्सवाच्या निमित्ताने राज्यात दोन कोटी वृक्षांची लागवड केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र कार्यक्रमातील या मुलाखतीत दोन कोटी वृक्षांची लागवड करण्यामागची पार्श्वभूमीदोन कोटी वृक्ष लागवडीचे राज्य तसेच जिल्हा स्तरावरील नियोजनवृक्ष लागवडीचे महत्ववन विभागाने दोन कोटी वृक्ष लागवडीसाठी घेतलेला पुढाकार आदी विषयांची श्री. मुनगंटीवार यांनी या मुलाखतीत माहिती  दिली आहे. ज्येष्ठ सूत्रसंचालक प्रदीप भिडे  यांनी ही मुलाखत घेतली आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages