आयटीआय प्रवेश प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आयटीआय प्रवेश प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण होणार

Share This
मुंबई, दि. 18 : आयटीआय अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया लवकरच सुरु केली जाईल. प्रत्यक्ष प्रशिक्षण सत्र वेळेवर सुरु होणार असून प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रशिक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही, असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे प्र. संचालक दयानंद मेश्राम यांनी कळविले आहे.


शासकीय व अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया इयत्ता 10 वीचा (S.S.C.) निकाल घोषित झाल्यानंतर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत सुरु केली जाते. काही अपरिहार्य कारणास्तव यावर्षीची प्रवेश प्रक्रिया सुरु होण्यास काही कालावधी आहे. मात्र ते विहित मुदतीत पूर्ण करुन प्रत्यक्ष प्रशिक्षण सत्र वेळेवर सुरु होईल. विद्यार्थी व पालकांनी प्रवेशासंबंधीच्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन मेश्राम यांनी केले आहे. प्रवेश प्रक्रियेबाबतची अद्ययावत माहिती वेळोवळी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर www.dvet.gov.in तसेच नजिकच्याऔद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध करुन दिली जाईल.



औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यासाठीची प्रवेश प्रक्रियेसंबंधीची व प्रमाणित कार्यपध्दतीची माहिती पुस्तिका सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांत दि. 15 जून, 2016 पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. अर्जस्वीकृती, विकल्प सादर करणे व प्रवेशप्रक्रियेचे विविध टप्पे इत्यादी प्रक्रियेबाबत समुपदेशन सर्वऔद्योगिक प्रशिक्षण संस्थांत दररोज आयोजित करण्यात येत आहे. माहितीपुस्तिकेत नमूद असलेल्या टप्प्याप्रमाणेच प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार असून त्यासंदर्भात वेळापत्रक स्वतंत्रपणे वर्तमानपत्रांत प्रसिध्द केले जाईल, असेही श्री. मेश्राम यांनी सांगितले.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages