प्रारुप विकास आराखडा, विकास नियंत्रण नियमावली व अहवाल संकेत स्थळावर उपलब्ध ! - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

प्रारुप विकास आराखडा, विकास नियंत्रण नियमावली व अहवाल संकेत स्थळावर उपलब्ध !

Share This
सूचना व हरकती नोंदविण्याची अंतिम तारीख २९ जुलै २०१६ 
मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे तयार करण्यात आलेला प्रस्तावित 'प्रारूप विकास नियोजन आराखडा (२०३४)', `प्रारुप विकास नियंत्रण नियमावली (२०३४)' आणि 'प्रारूप विकास नियोजन आराखडा (२०३४) अहवालमहापालिकेच्या www.mcgm.gov.in अथवा portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहेतसेच सदर बाबी महापालिका मुख्यालयात देखील अवलोकनार्थ उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेतयाबाबत नागरिकांना त्यांच्या सूचना व वा हरकती महापालिकेच्या संकेतस्थळावर तसेच पत्राद्वारे नोंदविता येणार आहे. मात्र याबाबत दिनांक २७ मे २०१६ पूर्वी मांडण्यात आलेल्या आणि २९ जुलै २०१६ रोजी कार्यालयीन कामकाजाच्या कालावधीनंतर येणा-या सूचनाहरकतींचा विचार केला जाणार नाहीअसे महापालिकेच्या विकास नियोजन खात्याद्वारे कळविण्यात आले आहे.


बृहन्मुंबई महापालिकेद्वारे तयार करण्यात आलेला प्रस्तावित 'प्रारूप विकास नियोजन आराखडा (२०३४)', `प्रारुप विकास नियंत्रण नियमावली(२०३४)' आणि 'प्रारूप विकास नियोजन आराखडा (२०३४अहवाल'महापालिकेच्या संकेतस्थळावरील ''प्रारुप विकास नियोजन आराखडा -२०१४-३४या लिंक अंतर्गत उपलब्ध आहेत्याचबरोबर सदर बाबी महापालिकेच्या मुख्य इमारतीतील दुस-या मजल्यावर असणा-या सभागृह क्रमांक ३ मध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी १ आणि दुपारी २ ते सायंकाळी ५ या दरम्यान अवलोकनार्थ उपलब्ध असणार आहे.

प्रस्तावित 'प्रारूप विकास नियोजन आराखडा (२०३४)', `प्रारुप विकास नियंत्रण नियमावली (२०३४)' आणि 'प्रारूप विकास नियोजन आराखडा(२०३४अहवालया बाबत सूचना व वा हरकती पत्राद्वारे (Hard Copies मध्येखाली नमूद केलेल्या पत्यावर कळविता येणार आहेत. सूचना आणि हरकती स्वीकृती मेज(Suggestions & Objections Receipt Counter) नागरी सुविधा कक्ष (CFC), बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयमुख्य इमारत, फोर्टमुंबई – ४००००१ या पत्त्यावर पाठवायच्या आहेत. तपशिलानुसार प्राप्त सूचना व वा हरकती या वैध मानल्या जातीलतसेच वरील पत्त्याव्यतिरिक्त महापालिकेच्या कोणत्याही विभाग कार्यालयात अथवा परिमंडळ कार्यालयात सूचना व वा हरकती स्विकारल्या जाणार नाहीतयाची सर्व संबंधितांनी कृपया नोंद घ्यावीअसे महापालिकेच्या विकास नियोजन(DP) खात्याद्वारे कळविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages