रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाइनवर मे महिन्यात १ हजार ३८२ कॉल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाइनवर मे महिन्यात १ हजार ३८२ कॉल

Share This
मुंबई / 6 june 2016 : रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) हेल्पलाइनवर मे महिन्यात तक्रारींचा पाऊस पडला आहे. प्रवाशांच्या मदतीसाठी असलेल्या हेल्पलाइनवर जवळपास १ हजार ३८२ कॉल आल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली. यामध्ये सर्वाधिक कॉल हरविलेल्या बॅगांबाबत आहेत.

प्रवाशांच्या मदतीसाठी ९८३३३३११११ क्रमांकाची हेल्पलाइन उपलब्ध करण्यात आली आहे. या हेल्पलाइनवर विविध प्रकारचे कॉल येत असतात. आलेल्या कॉलनंतर हेल्पलाइनकडून संबंधित रेल्वे पोलीस स्टेशनला माहिती दिली जाते आणि त्यानंतर प्रवाशांना त्वरित मदत पुरविण्यात येते. मे महिन्यात आलेल्या कॉलमध्ये सर्वाधिक ९८९ कॉल हे हरविलेल्या बॅगांबाबत आहेत. हेल्पलाइनद्वारे दिलेल्या मदतीतून जवळपास २४१ बॅगा प्रवाशांना परत मिळाल्या आहेत. जवळपास १७ लाख ९१ हजार ५७२ रुपये किमतीचा ऐवज परत मिळवून देण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages