पालिकेचे 168 आरोग्य केंद्रे लवकरच सक्षम करण्यात येतील - आय ए. कुंदन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेचे 168 आरोग्य केंद्रे लवकरच सक्षम करण्यात येतील - आय ए. कुंदन

Share This
मुंबई / प्रतिनिधी - केईएम, सायन, नायर आदी रुग्णालयात लहान-सहान, आजाराबाबत धाव घेणाऱया रुग्णांना त्यांच्या विभागातील आरोग्य केंद्रातच चांगल्या प्रकारे वैद्यकीय सुविधा देण्यात येईल. त्यामुळे मोठय़ा रुग्णालयावर रुग्णांच्या संख्या वाढीमुळे पडणारा ताण कमी होणार आहे. या संदर्भातील माहिती अतिरिक्त आयुक्त आय ए. कुंदन यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिली. पालिकेचे 168 आरोग्य केंद्रे लवकरच सक्षम करण्यात येतील, असे कुंदन यांनी सांगितले असल्याचे विनोद शेलार यांनी आरोग्याविषयक प्रस्तावावर चर्चा करताना सांगितले.

पालिकेच्या रुग्णालयात विशेषतः उपनगरातील रुग्णालयातच डॉक्टरांची कमतरता आहे, ही डॉक्टरांची संख्या वाढविणार केव्हा ? असा सवाल त्यांनी केला होता.   काँग्रेसचे सुनील मोरे यांनी, केईएम रुग्णालयात रोज साडेसात हजार रुग्ण उपचारासाठी येत असल्याचे सांगत रुग्णालयात मात्र 1 हजार 700 ते 1 हजार 800 बेड असून त्या बेडवर रुग्ण उपचार घेत असतात. परंतु, त्या रुग्णांना रुग्णालयात औषधे मिळत नाहीत. 50 टक्के रुग्णांना बाहेरून महागडी औषधे खरेदी करावी लागतात. रुग्णांना हॅण्डग्लोव्हज, सामग्री बाहेरून आणावी लागते, अशी तक्रार मोरे यांनी केली.
शिवसेनेच्या डॉ. अनुराधा पेडणेकर यांनी पालिका रुग्णालयासाठी कोटय़वधी रुपये खर्चून रुग्णांसाठी औषधे खरेदी केली जात असतानाही रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्यास डॉक्टर सांगतात, अशी तक्रार केली. तसेच डॉक्टर आणि एम. आर. यांचे साटेलोटे असून त्यातून रुग्णांची ससेहोलपट, पिळवणूक होते. तर  औषधे कंपन्यांची चंगळ होत असल्याचे पेडणेकर म्हणाल्या. यावेळी अन्य नगरसेवकांनी काही तक्रारी केल्या

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages