आंबेडकरांच्या वारसांनी आंबेडकर भवन गुंडांचा अड्डा बनवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 June 2016

आंबेडकरांच्या वारसांनी आंबेडकर भवन गुंडांचा अड्डा बनवले

पिपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टच्या अनधिकृत सल्लागार रत्नाकर गायकवाड यांचा आरोप 
जीव घेतला तरी आंबेडकर भवन बांधणारच 
पोलीस आणि बाऊन्सरच्या संरक्षणात पत्रकार परिषद संपन्न 
मुंबई / प्रतिनिधी 28 June 2016
बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पिपिल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचे दादर येथील आंबेडकर भवन आंबेडकरी घराण्याच्या वारसांनी गुंडांचा अड्डा बनवला होता असा आरोप ट्रस्टचे अनधिकृत सल्लागार रत्नाकर गायकवाड यांनी केला. आंबेडकर भवन पाडल्यानंतर आंबेडकरी जनतेमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. माझ्या नावाने हे प्रकरण शेकवले जात असल्याने आपण ही परिषद घेत असल्याचे गायकवाड म्हणाले. यावेळी आपण ट्रस्टच्या पदाचा राजिनामा दिला आहे. ट्रस्टमध्ये सल्लागार हे पद नसल्याचा खुलासा गायकवाड यांनी केला. 
मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आम्ही लाखो लाखो रुपये खर्चून वृत्तपत्राना जाहिराती देऊन आंबेडकरी जनतेला भवन पाडणार असल्याचे सांगितले होते.  त्याच प्रमाणे नोटीस देऊन प्रकाश, आनंदराज, भीमराव आंबेडकर यांनाही कळविले होते. १९६७ साली बांधण्यात आलेले आंबेडकर भवन बाबासाहेब आंबेडकर यांनी बांधलेले नाही. ही इमारत जीर्ण झाल्याने आम्ही या ठिकाणी नवे १७ मजली आंबेडकर भवन बांधण्यासाठी जुनी इमारत पाडल्याचे गायकवाड म्हणाले. ही इमारत रात्रीच्या वेळी का तोडली याचा खुलासा करताना रात्री आमच्या ट्रस्टीना इमारतीचा काही भाग पडल्याचे निदर्शनास आल्याने रात्रीच ही इमारत पाडण्यात आल्याचे सांगताना रात्रीच्या रात्री इमारत पाडण्यासाठी लागलेला फौजफाटा कुठून आणला हे सांगण्याचे मात्र गायकवाड यांनी टाळले. 

बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः त्यांच्या वारसांना या ट्रस्टमध्ये घेऊ नका असे सांगितले आहे. बाबासाहेबांनी जे सांगितले त्याचे आम्ही पालन करत आहोत असा खुलासा करताना रत्नाकर गायकवाड आणि त्यांचे मेहुणे विजय रणपिसे हे ट्रस्टवर चालतात मग आंबेडकर घराणे ट्रस्ट मध्ये का चालत नाही असा प्रश्न विचारल्यावर आंबेडकर घराण्यातील व्यक्ती ट्रस्ट वर घेतला तर ट्रस्टचे वाटोळे होईल असे गायकवाड म्हणाले. आंबेडकर घराण्याला आंबेडकरांच्या नावाशी काहीही घेणे देणे नसून यांना प्रॉपर्टी हडप करायची आहे असा आरोप गायकवाड यांनी केला. बाबासाहेबांचे नातू असल्याचा फायदा यांना उचलायचा आहे. उद्या हे भारतीय राज्य घटनेवर आपला अधिकार सांगतील असे सांगत आंबेडकर घराण्याची खिल्ली उडवली आहे. 

आंबेडकर भवन जीर्ण झाल्याने आम्ही पाडले असे सांगणाऱ्या गायकवाड यांनी पालिकेलाही खोटे ठरवले आहे.पालिकेने ही इमारत आम्ही पाडली नाही असा खुलासा करताना या इमारतीची पुनर्बांधणी करण्याचे पत्र  ट्रस्ट कडून प्राप्त झाल्याने आम्ही जुनी इमारत पाडून नवी इमारत बांधण्यासाठी आयओडी दिल्याचे म्हटले होते. पालिकेने दिलेल्या माहितीची खिल्ली उडवत ट्रस्टने दोन वेळा स्ट्रक्चरल ऑडिट केल्या नंतर इमारत धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर इमारत पाडण्यासाठी ३५४ ची नोटीस मिळाल्याने ही इमारत पडली असे गायकवाड यांनी सांगितले. 

बाऊन्सर आणि पोलिस संरक्षणात पत्रकार परिषद 
आम्ही बाबासाहेबांच्या विचारावर चालणारे लोक आहोत असे सांगणारे रत्नाकर गायकवाड यांना पत्रकार परिषद घेताना बाऊन्सर आणावे लागले होते. हे बाऊन्सर पत्रकार परिषदेला येणाऱ्या पत्रकारांना अडवून ओळखपत्र तपासात होते. त्यानंतरच पत्रकारांना आत पत्रकार परिषदेच्या ठिकाणी सोडण्यात येत होते. आंबेडकर भवन तोडल्याने आंबेडकरी जनतेमध्ये संतापाची भावना आहे. यामुळे काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad