सामाजिक न्याय मंत्रालयातून वंचितांना आर्थिक न्याय देणार - रामदास आठवले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सामाजिक न्याय मंत्रालयातून वंचितांना आर्थिक न्याय देणार - रामदास आठवले

Share This
केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदास आठवलेंचे मुंबई विमानतळावर भव्य स्वागत
मुंबई दि 8 -- सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालय हे केवळ दलित वर्गाचे मंत्रालय नसून ती 125 कोटी भारतीय नागरिकांची जबाबदारीआहे सामाजिक न्याय हे सर्व भारतीयांचे मंत्रालय असून त्यायोगे देशभरातील दलित शोषित वंचित घटकांना आर्थिक न्याय देण्याचे काम करणार असल्याचा निर्धार रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ताथा नवनियुक्त केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी आज केला

केंद्रिय राज्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज प्रथमच आठवलेंचे मुंबईत आगमन झाले मुंबई विमानतळावर आंबेडकरी जनतेने उत्स्फूर्त केलेल्या भव्य स्वागताचा स्वीकार केल्यानंतर थेट चैत्यभूमी येथे  पोहोचुन  महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आठवलेंनी अभिवादन केले चैत्यभूमी येथे उपस्थित चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केल्यानंतर गर्दीला आठवलेंनी संबोधित केले 

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर त्यांनी निर्माण केलेल्या रिपब्लिकन पक्षाचा आणि आंबेडकरी चळवळीचा  कुणीही नेता केंद्रियमंत्रीपदी पोहोचू शकला नाही मात्र संघर्षनायक रामदास आठवले हे केंद्रियमंत्रीमंडळात समावेश झालेले पहिले रिपब्लिकन नेते ठरले आहेत हा इतिहास रचल्याबद्दल आठवलेंचे संपूर्ण देशात कौतुक  होत आहे  देशभरातील आंबेडकरी जनता जगभरातील बौद्धबांधवांनी आठवलेंचे अभिनंदन केले आहे  दुबई  लंडन अमेरिका जपान सिंगापुर बँकॉक  नेपाळ  तैवान श्रीलंकेतून आदी राष्ट्रांतुन  अभिनंदन करणारे फोन आल्याचे आठवले यांनी यावेळी सांगितले  चैत्यभूमी येथे भेट दिल्यानंतर नामदार रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची शुभेच्छापर भेट घेतली आणि आभार मानले 
  
मुंबई डोमेस्टिक विमानतळ येथे नामदार रामदास आठवलेंची सजविलेल्या रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा  भेट देऊन आठवलेंचा कार्यकर्त्यांनी सत्कार केला शुभेच्छांच्या वर्षावात आठवले न्हाऊन निघाले.  विमानतळावर ढोल बाजा वाजवून फटाक्यांची आतिषबाजी करीत संपूर्ण विमानतळ परिसर निळ्या झेंड्यांनी निळा केला होता महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयजयकाराने दुमदुमून गेला 62 किलो लाडू वाटप करून आनंद साजरा करण्यात आला 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages