१२ जुलै रोजी ‘मुंबई मराठी पत्रकार संघा’त खड्डयांच्या छायाचित्रांचे जाहीर प्रदर्शन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

१२ जुलै रोजी ‘मुंबई मराठी पत्रकार संघा’त खड्डयांच्या छायाचित्रांचे जाहीर प्रदर्शन

Share This
मुंबई- ‘मुंबईत केवळ ६६ खड्डे आहेत’, हा मुंबई महानगरपालिकेचा दावा किती फोल आहे, शहर परिसरातील रस्त्यांची किती दुरवस्था झाली आहे, याचे वास्तववादी चित्र दाखवण्यासाठी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या आदेशानुसार कार्यकर्त्यांनी शहर परिसरात ‘खड्डे मोजा मोहीम’ राबवली होती. २ जुलैपासून राबवण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत मुंबईभरातील ४५० खड्डयांची मोजणी करण्यात आली असून त्यांची उत्तम छायाचित्रे काढण्यात आली आहेत. या खड्डयांच्या छायाचित्रांचे जाहीर प्रदर्शन येत्या १२ जुलै रोजी आझाद मैदान येथील ‘मुंबई मराठी पत्रकार संघा’त सकाळी १० ते रात्री १० या वेळेत भरवण्यात आले आहे. खड्डयांची विभागवार नावासहित उत्तम छायाचित्रे काढण्यात आली आहेत. या खड्डयांची अंतिम मोजणी करून रस्त्यांची ही चाळण छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात येत आहे. या प्रदर्शनाला सर्वानी मोठय़ा संख्येने भेट देऊन ही वास्तववादी छायाचित्रे पाहून मुंबईकरांची फसवणूक करणा-या मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपाच्या भ्रष्ट कारभाराची कशी लक्तरे काढली आहेत हे पाहावेच, असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages