मुंबइकरांना मिळधार समान वीजदर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबइकरांना मिळधार समान वीजदर

Share This
- रिलायन्स, टाटा कंपन्याचे होणार ऑडिट
- ऊर्जा मंत्री बावनकुळे यांची विधान सभेत घोषणा
मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या टाटा आणि रिलायन्स या दोन्ही कंपन्यांचे सीएजी (कॅग) मार्फत ऑडीट केजे जाईल तसेच लवकरच ० ते १०० युनिट पर्यत मुंबईकरांना वीज दर समान मिळतील अशी घोषणा ही उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत केली.

मुंबईत वीज पुरवठा करणाऱ्या रिलायन्सटाटामहावितरण आणि बेस्ट या चारही कंपन्यांचे वीज दर वेगवेगळे असल्याने मुंबईकर त्रस्त आहेत. एकाच शहरात चार दर असू नये अशी मागणी सरकार कडे गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे.आज विधान सभेत याबाबत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर्षी ते 100 युनिट पर्यंत समान दर असतील आणि पुढच्या टप्प्यात 300 युनिट पर्यंत समान दराचा राज्य सरकारचा प्रयत्न राहील अस सांगितलं.  मुंबईला वीज पुरवठा करणारया टाटा आणि रिलायन्स कंपन्यांचे कॅग कडून ऑडिट केल जाईल अशी घोषणा ही त्यांनी केली.

विधानसभेत आज उर्जा विभागाच्या पुरवणी मागण्यांवर बोलताना आ.आशिष शेलार यांनी मुंबईतील वीज ग्राहकांचा प्रश्न उपस्थित केला. मुंबईला टाटारिलायन्सबेस्ट आणि महावितरण या चार वेगवेगळ्या कंपन्या वीजपुरवठा करतात या चारही कंपन्यांच्या वीज दरात तफावत आहेटाटा आणि रिलायन्स यांचे वीज दर जास्त असल्यामुळे ग्राहकांमध्ये या कंपन्यान विषयी नाराजी आहे. या दोन कंपन्या भांडवली खर्च वाढवून दाखवतात व त्यांचे ऑडीट केले जात नाही त्यामुळे वीजदर वाढीव आकारले जातात. म्हणून या दोन्ही कंपन्यांचे सीएजी (कॅग) मार्फत ऑडीट करण्यात यावे अशी मागणी शेलार यांनी केली तसेच मुंबईला समान वीजदर लागू करण्यात यावेत अशी ही आग्रही मागणी यावेळी केली.

या चर्चेला उत्तर देताना उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले कीदोन्ही कंपन्यांचे ऑडीट करण्याचे निर्देश उद्याच देण्यात येतील तसेच मुंबईत वेगवेगळे वीजदर असून ते समान करण्याबाबत सरकार ही प्रयत्न करत आहे. याबाबत कंपन्यान सोबत साकारात्मक चर्चा सुरू आहे. बेस्टमहावितरण व टाटा यांनी समान वीजदर करण्यास संमती दर्शवली आहेतर रिलायन्स सारख्या कंपनीने अद्याप सहमती दर्शवली नाही. त्याबाबत आपण फेरविचार करावा अशी सूचनाही सरकारने त्यांना केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages