भाजपाला दिलेले ‘कमळ’ निवडणूक चिन्ह रद्द केले जावे - न्यायालयात याचिका - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भाजपाला दिलेले ‘कमळ’ निवडणूक चिन्ह रद्द केले जावे - न्यायालयात याचिका

Share This
मुंबई 8 July 2016 : ‘कमळ’ हे भारताचे राष्ट्रीय फूल असल्याने कोणत्याही राजकीय पक्षास त्याचा राजकीय लाभासाठी उपयोग करू दिला जाऊ शकत नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला दिलेले ‘कमळ’ हे निवडणूक चिन्ह रद्द केले जावे, अशी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी ही याचिका केली असून त्यात म्हटले आहे की, भाजपाला ‘कमळ’ या राष्ट्रीय फुलाचा निवडणुकीसाठी वापर करू देणे हा १९५० च्या राष्ट्रीय चिन्हे अणि नावांच्या दुरुपयोग प्रतिबंधक कायद्याचा भंग आहे. त्यामुळे भाजपाला दिलेले ‘कमळ’ हे निवडणूक चिन्ह रद्द करण्याचा आदेश निवडणूक आयोगास द्यावा, अशी याचिकाकर्त्याची विनंती आहे.

ही याचिका पुढील आठवड्यात प्राथमिक सुनावणीसाठी न्यायालयापुढे येण्याची अपेक्षा आहे. याचिकेतील मुद्द्यांचा विचार करून ‘कमळ’ निवडणूक चिन्ह म्हणून वापरण्यासंबंधीचे सर्व रेकॉर्ड निवडणूक आयोगाकडून मागवून घ्यावे व तसे करणे योग्य की अयोग्य याचा निकाल होईपर्यंत हे निवडणूक चिन्ह गोठविले जावे, अशीही मागणी याचिकेत केली गेली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages