मुंबई, दि. 22 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यात चालू आठवड्यात एकूण 26 हजार 233 कामे सुरु असून, त्यावर 2 लाख 15 हजार 423 इतकी मजूर उपस्थिती आहे.
9 जुलै 2016 रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये मागील आठवड्यापेक्षा मजूर उपस्थितीत घट झाली आहे. यामध्ये सर्वात जास्त घट गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, लातूर,जळगाव, यवतमाळ, अहमदनगर, परभणी, नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये झाली असून अमरावती, बीड, उस्मानाबाद,सोलापूर, रायगड या जिल्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. राज्यामध्ये एकूण 4 लाख 16 हजार 850 इतकी कामे शेल्फवर ठेवण्यात आली आहेत. यामध्ये मजूर क्षमता 1,251.16 लाख इतकी आहे. एकूण शेल्फवरील कामांपैकी 3 लाख 14 हजार 288 कामे ग्रामपंचायतीकडे आणि उर्वरित 1 लाख 2 हजार 562 कामे यंत्रणेकडे आहेत.
No comments:
Post a Comment