साहित्य खरेदीमध्ये फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार - दादाजी भुसे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

साहित्य खरेदीमध्ये फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार - दादाजी भुसे

Share This
मुंबई, दि. 22 : शेती उपयोगी साहित्य खरेदीबाबत शेतक-यांची फसवणूक करणा-यांवर विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करणार आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत सांगितले.


कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी विभागात शेती उपयोगी साहित्य खरेदीत झालेल्या गैरव्यवहारासंदर्भातला प्रश्न विधानसभा सदस्य अजित पवारचंद्रदीप नरकेबाळासाहेब थोरातहसन मुश्रीफ यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.
            
भुसे यावेळी म्हणाले कीजिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने शेती उपयोगी साहित्य खरेदी योजनेस प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी घेतली आहे. ई निविदा प्रक्रियेद्वारे साहित्याची खरेदी करण्यात आली आहे. शेतक-यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी भविष्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेतीपयोगी साहित्याचा निधी जमा करण्यासाठी राज्य शासनामार्फत धोरण ठरविण्यात येत आहे. नवीन धोरण ठरविताना विधानसभा सदस्यांच्या सूचना विचारात घेतल्या जातील.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages