प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे संगणकीकरण करणार - दिवाकर रावते - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे संगणकीकरण करणार - दिवाकर रावते

Share This
मुंबई, दि. 22 : राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील बनावट परवाने बंद करण्यासाठी आता कार्यालयांचे संगणकीकरण करण्याचे कार्य सुरू आहे. सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी कार्यालयांचे संगणकीकरण करण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज विधानसभेत सांगितले.


ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात बनावट रिक्षा परवाने देणारे रॅकेट कार्यरत असल्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य नितेश राणे,सीमाताई हिरेअबू आजमीआशिष शेलार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.
            
रावते म्हणाले कीअवैध परवान्यांच्या निर्मितीसंदर्भात चौकशी करण्यासाठीची समिती नेमण्यात आली आहे. समितीच्या अहवालानुसारच पुढील कारवाई करण्यात येणार आहे. कार्यालयातील परवान्यासंदर्भातील सर्व कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी संगणकीकरण करण्यात येणार आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्राप्त 220 अवैध परवाने रद्द करण्याची कारवाई सुरू असून,ज्यांनी दलालांमार्फत हे परवाने घेतले अशा चालकांवर कारवाई करण्यासंदर्भात न्याय व विधी विभागाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. याचबरोबर वाहनांच्या पार्किंगसंदर्भात निर्णय घेण्यासाठी नगरविकास आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेची एकत्रित बैठक घेऊन उपाययोजना करण्यात येतील. राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांच्या समस्या लक्षात घेऊन ओला व उबेर या टॅक्सी सेवांच्या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेणार असून लवकरच विधानसभेत तो निर्णय जाहीर केला जाणार असल्याचेही रावते यांनी स्पष्ट केले.
            
ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात बनावट रिक्षा परवाने देणारे रॅकेट अनेक वर्षापासून कार्यरत असल्याचे निदर्शनात आले असून,संबंधित लिपिक व दलाल यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचे परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांनी उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages