राज ठाकरे यांच्या विरोधात अट्रोसिटीचा गुन्हा दाखल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज ठाकरे यांच्या विरोधात अट्रोसिटीचा गुन्हा दाखल

Share This
मुंबई २६ जुलै २०१६ - बौद्ध व मागासवर्गीय समाजावर गेल्या काही वर्षात सातत्याने वाढ होत आहे. बौद्ध व मागासवर्गीय समाजावर अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत असताना या समाजासाठी कधीही धावून न येणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोपर्डी येथील पीडित मुलीच्या घरच्यांची भेट घेतल्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करायला हवा अशी मागणी पत्रकार परिषदेत केली. यामुळे बौद्ध समाजात राज ठाकरे यांच्या विरोधात संतापाची लाट पसरली असून राज यांच्या विरोधात जालन्यात अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर निकाळजे यांनी तशी तक्रार दिली होती. ज्या ज्या मराठा संघटनेने आपल्या अजेंड्यात ऍट्रॉसिटी ऍक्ट बंद करण्याची मागणी केलेली आहे त्यांनी सुद्धा लवकरात लवकर आपला अजेंडा बदलावा अन्यथा तुमच्यावर सुद्धा अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करू असा इशारा निकाळजे यांनी दिला आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages