मुंबई : विनाहेल्मेट प्रवास हा धोकादायकच असून, त्यामुळे होणाऱ्या अपघातांत अनेक दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागतो. मुंबईत जानेवारी ते जून या सहा महिन्यांत १0२ दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे बसणाऱ्यांच्या मृत्यूची नोंद वाहतूक पोलिसांकडे झाली आहे.
हेल्मेट सक्तीसाठी धडपड करणाऱ्या परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या दुचाकीस्वारांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. मुंबई वाहतूक पोलिसांकडे असलेल्या नोंदीनुसार जानेवारी ते जून या सहा महिन्यांत दुचाकीस्वारांच्या अपघातांत ७२ दुचाकीस्वार तर ३0 सहप्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तब्बल २३३ बाइकस्वार हे गंभीर जखमी झाले. काही दुचाकीस्वार आणि सहप्रवाशांना अंथरुणाला खिळले आहे. मुंबईत सर्वाधिक मृत्यूची नोंद ही जानेवारी, फेब्रुवारी, मे, जून या महिन्यांत झाल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. कुलाबा, भायखळा, कांदिवली, बोरीवली, मालाड, सायन, वांद्रे, अंधेरी या परिसरात अपघात जास्त झाले आहेत.
हेल्मेट परिधान न केल्यामुळे होणाऱ्या अपघातांत दुचाकीस्वार आणि सहकाऱ्याला जीव गमवावा लागतो. त्यामुळे शासनाकडून हेल्मेटसक्ती करण्यासाठी अनेक उपाय करण्यात येत आहेत. २0१६च्या जानेवारी महिन्यापासून त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. मात्र दुचाकीस्वारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने परिवहन विभागाकडून ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’चा नियम काढण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी १ आॅगस्टपासून करण्याचा निर्णय घेतला. त्याला पेट्रोल पंप चालक-मालकांकडून विरोध करण्यात आल्यानंतर १६ आॅगस्टपासून मुंबई वाहतूक पोलिसांकडून पेट्रोल पंपावर येणाऱ्या दुचाकीस्वारांच्या नंबरची नोंद करण्यास सुरुवात करत कारवाई केली.

No comments:
Post a Comment