मुंबई - लोकलमध्ये व स्थानकांवर अपंग प्रवाशांना आवश्यक सोई-सुविधा न दिल्यास मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांविरुद्ध न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई उच्च न्यायालयाने दिला.
मध्य व पश्चिम रेल्वे स्थानकांवर अपंग प्रवाशांसाठी पुरेशा सुविधा पुरवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत; मात्र अद्याप त्याची पूर्तता झालेली नाही. या पार्श्वभूमीवर सोई-सुविधांचे ऑडिट करण्याची तयारी "नेचर अँड नर्चर‘ या सामाजिक संस्थेने दाखवली आहे. रेल्वेने या ऑडिटला तीव्र विरोध केला आहे. खासगी संस्थेकडून तपासणी करून घेण्यापेक्षा सरकारी संस्थेने ऑडिट करावे, अशी मागणी रेल्वेच्या वतीने करण्यात आली. मात्र न्यायालयाने अपंगांच्या सुविधांविषयी ऑडिट करण्याबाबत रेल्वेने घेतलेल्या असहकाराच्या भूमिकेबाबत रेल्वे मंत्रालयाला खडे बोल सुनावले. रेल्वेला कुणी मदत करत असेल, तर त्याचे स्वागत करायला हवे; पण रेल्वेचा विरोध अकारण आहे, असे न्यायालय म्हणाले.

No comments:
Post a Comment